Marathwada Water Shortage : मे महिन्याच्या सुरुवातीलाच मराठवाड्याचा आता टँकर वाडा झाला आहे. मराठवाड्यातील सात जिल्ह्यात तब्बल 1424 टँकर सध्या पाणीपुरवठा सुरू आहे हिंगोली जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा सुरू झाला आहे. सर्वाधिक संख्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आहे या जिल्ह्यात 569 टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2020 ते 2022 हे तीन वर्षात मराठवाड्यात अतिवृष्टी झाली होती त्यामुळे पाणी पातळी चांगली होती मात्र गेल्या वर्षी मान्सून लांबला आणि त्यामुळे पाणी पातळीवर गंभीर परिणाम झाला. मे महिन्याच्या अखेरपर्यंत टँकरची ही संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे.. 1424 हा आकडा सरकारी आहे खाजगी टँकर इतक्याच संख्येने पाणी विकत असल्याचाही चित्र आहे.


संभाजी नगर मध्ये 569,  जालना 418, परभणी 5, नांदेड 15, बीड 302, लातूर 13 तर धाराशिवमध्ये 102 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. 


राज्यातील तापमानात प्रचंड वाढ


राज्यात सूर्य अक्षरश: आग ओकतोय. सगळीकडे तापमानात प्रचंड वाढ झाली. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झालेत. सर्वाधिक पारा हा सोलापुरात  
जाणवतोय. सोलापुरात 44 अंश सेल्सिअसवर पारा गेलाय. जेऊरमध्ये तर 44.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदलं गेलंय. तर मुंबई आणि उपनगरातही तापमानात प्रचंड वाढ झालीय. मुंबईचा पारा 34.1 अंशांवर गेलाय. तर मुंबई उपनगरात तापमान 38.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलंय.


वन्यजीवांची तहान भागन्यांसाठी जंगल परिसरात कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती


वाशिम जिल्ह्यात सूर्य आग ओकत आल्याने जंगल परिसरातील नदी,नाल्यासह नैसर्गिक पाणवठे आटत चालले आहे. काही भागात वन्यप्राण्यांना पाणी मिळत नसल्यानं वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा आता गावखेड्याकडे वळविला आहे. वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकंती करीत  त्यांचा जीव धोक्यात येत असल्यानं वाशिम च्या वनोजा येथील वनपरिक्षेत्रांतील प्रादेशिक जंगलात कृत्रिम पाणवठ्याची निर्मिती करण्यात आली असून पाणवठ्यात वनविभागाकडून वेळोवेळी टँकरनं पाणी भरून वन्यजीवांची तहान भागविली जात आहे.त्यामुळे वन्यजीवांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यास मदत होणार आहे.