COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुलडाणा :  मोताळा येथील मोहेंगाव येथे २००, ५०० आणि २००० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याची किंमत एक कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. या बनावट नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर चौघे फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शेतातून कोट्यवधींच्या बनावट नोटांनी भरलेली बॅग बोराखेडी पोलिसांनी जप्त केली. 



मोहेंगावनजीक बोराखेडी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर बोराखेडी पोलिसांनी येथील आश्रम शाळेमागील शेतातून कोट्यवधींच्या बनावट नोटांनी भरलेली बॅग जप्त केली. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेल्या नोटांचे मूल्य किती आहे, हे अद्याप समजू शकले नाही. या बनावट नोटांची मोजदाद सुरू करण्यात आली आहे. जवळपास एक कोटी रुपयांचे हे बनावट चलन असल्याचे सांगण्यात येत आहे.  २००, ५०० आणि २००० रुपयांच्या बनावट नोटा असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.



पोलिसांना संध्याकाळी गुप्त माहिती मिळाली. मोहेंगाव या ठिकाणी नोटांचा व्यवहार सुरू आहे. त्यामध्ये जवळपास एक कोटींच्या बनावट नोटा आहेत. दरम्यान, जिथे या नोटांची डील होत होते, त्या ठिकाणी डील करणाऱ्यांमध्ये वाद झाला. त्याचवेळी पोलिसांनी तेथे छापा मारला. यावेळी एक जण पोलिसांच्या हाती लागला. त्याचे तीन ते चार साथीदार पळून जाण्यात यशस्वी झालेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.