पराग डोभाले, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Burqa Man in Nagpur news: नागपुरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एक तरुण बुरखाधारी महिला डॉक्टराच्या वेशात रुग्णालयात फिरत होता. गेली 10 ते 12 दिवस हा प्रकार चालला होता. पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी चौकशी करताच तपासात धक्कादायक सत्य समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


रुग्णालयात महिलांच्या वेशात तरुण


नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय तथा महाविद्यालयात (मेयो) परिसरातून बुरखाधारी महिला डॉक्टरच्या वेशात फिरणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. जावेद शेख शफी शेख असं महिलेच्या वेशात फिरणाऱ्या तरुणाचे नाव आहे. 


गेल्या काही 10 ते 12 दिवसांपासून परिसरात नवीनत बुरखाधारी महिला डॉक्टर वार्ड तसेच रुग्णालय परिसरात फिरताना दिसून आली होती. त्यामुळं तिच्यावर संशय आला. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या महिला कर्मचाऱ्याला तिच्यावर संशय आल्याने तिला थांबवले व  तहसील पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. 


महिलेचा आवाजही काढून दाखवला


सुरुवातीला कपडे आणि हावभाव पाहून ती महिला डॉक्टरच असल्याचे वाटले. तिच्याकडे ओळखपत्रदेखील मागितले. संबंधित तरुणाने महिलेचा आवाज काढण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळं त्याच्यावरचा संशय आणखीनच बळावला. तहसील पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली. तेव्हा मात्र वेगळाच प्रकार समोर आला. यावेळी ती बुरखाधारी महिला नसून तरुण असून त्याच नाव जावेद शेख अस नाव आहे. तो पत्ता ताजबाग मागे राहत असल्याचं त्याने सांगितल. 


चौकशीत धक्कादायक सत्य समोर


तरुणाला पुरुषांचे आकर्षण आहे. त्यामुळं तो रुग्णालयाच्या आवारात महिलेच्या रुपात फिरत होता. गेली कित्येत दिवस तो रुग्णालयाच्या आवारात महिलेच्या वेशात फिरत होता. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे महिला वापरतात त्या वस्तूही आढळून आल्या आहेत. तसंच, त्याच्या जवळून तीन मोबाईल पोलिसांकडून जप्त करण्यात आले असून प्राथमिकरित्या चोरीचे मोबाईल आहेत? का याचीदेखील चौकशी केली जात आहे. 


पोलिसांनी केले तरुणाला अटक


पोलिसांकडून तरुणाला अटक करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर पुढील तपास सुरू आहे.