शिर्डी : सलग तीन दिवस लागून आलेल्या सुट्यामुळे शिर्डीत साईबाबाच्या दर्शनासाठी आणि शनि शिंगणापुरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन लाखांहून आधिक भाविक शिर्डीत दाखल झालेत. वाढलेल्या भक्तांच्या गर्दीनं साई मंदिरकडे जाणारे सर्व रस्ते फुलून गेलेत.


शिर्डी आणि शनिशिंगणापूरकडे जाणाऱ्या रत्यावर मोठ्या प्रमाणात वाहनं दिसून येतायत. सलग सुट्यामध्ये शिर्डीला येणाऱ्या भक्तांचा ओघ लक्षात घेता साईबाबा संस्थानच्यावतीनं दर्शनाची तसंच निवासाची चोख व्यवस्था केलीय. 


त्याचबरोबर भक्तांच्या सुरक्षेचीही काळजी घेतली जातेय. याच बरोबरीनं शिंगणापुरातही शनि महाराजांच्या दर्शनासाठीही मोठी गर्दी झालीय.