बीड : लस घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांनी लसीकरण केंद्रावर (Corona Vaccination) मोठी गर्दी झाली आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी मोठी झुंबड पाहायला मिळाली. गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना  सौम्य लाठीमार करावा लागला. बीड जिल्ह्यात लस तुटवडा सर्वच लसीकरण केंद्र लसीअभावी बंद करण्याची वेळ आहे. ज्या केद्रावर लस मिळत आहे, त्याठिकाणी मोठी गर्दी झाल्याने हा गोंधळ झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीड जिल्ह्यात कोरोनाचा समूहसंसर्ग ( coronavirus) झपाट्याने वाढत चालल्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी आता जिल्ह्यातील नागरिक लस घेण्यासाठी धावपळ करू लागले आहेत. मात्र लसीचा तुटवडा असल्याने आज जिल्ह्यात केवळ तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु होते. अन्य 127 लसीकरण केंद्र लस अभावी बंद करावे लागले आहे. काल आरोग्य विभागाकडे केवळ 2600 लसीचे डोस उपलब्ध होते. 


लस केव्हा येणार याबाबत अधिकृतपणे आरोग्य विभागालाही माहिती नाही, अशी माहिती देण्यात आली. बीडमधील येळंब घाट येथील लसीकरण केंद्रावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लस घेण्यासाठी लावलेल्या रांगेमध्ये गर्दी पाहिली आणि पोलिसांनी गर्दी करणाऱ्या नागरिकांवर सौम्य लाठीमार केला. लस घ्यायला गेले आणि काठ्या खाऊन आले, लस काही मिळेना अशी परिस्थिती जिल्ह्यातील नागरिकांची झाली आहे.