Chandrapur News: 4 बछडे दगावले, मात्र आई कोण हेच माहिती नाही...
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरक्षेत्रातील शिवनी वनपरिक्षेत्रात आढळलेल्या चार वाघ बछड्यांच्या (tiger cubs) मृत्यूप्रकरणी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाचा खुलासा केला आहे.
आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरक्षेत्रातील शिवनी वनपरिक्षेत्रात आढळलेल्या चार वाघ बछड्यांच्या (tiger cubs) मृत्यूप्रकरणी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाचा खुलासा केला आहे. एका मोठ्या वाघाने या सर्व चार बछड्यांना (cubs dead) मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावून पायी गस्त करत या चार बछड्यांच्या (tigeress) माता वाघिणीबाबत माहिती घेतली जाणार आहे.
नक्की काय समोर आला प्रकार?
चंद्रपुरात 30 नोव्हेंबर रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर भागात 14 ते 15 वर्ष वयाच्या एका वाघिणीचा मृतदेह आढळला होता. आज याच भागात गस्त घालणाऱ्या प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांना चार वाघ बछडे मृतावस्थेत आढळल्याने यातील गुंतागुंत वाढली होती. व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाघीण मेलेल्या स्थानापासून तीन किलोमीटर हवाई अंतरावर हे चार बछडे मृत अवस्थेत आढळले आहेत. 30 नोव्हेंबर रोजी वाघिणीच्या मृत्यूनंतर या भागात गस्त घातली (tiger news chandrapur) असता हे चार बछडे फिरताना आढळले. मात्र त्यासोबत एक नर मोठा वाघ देखील कर्मचाऱ्यांना आढळून आला. मात्र आज सकाळी हिरडी नाला परिसरात या चारही बछड्यांचे थेट मृतदेहच आढळून आले.
हेही वाचा - गुगल सीईओ Sundar Pichai यांना पद्मभुषण पुरस्कार देऊन सन्मान
काय मिळाली माहिती?
शवांची प्राथमिक चौकशी केली असता या छोट्या बछड्यांवर नर वाघाने हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक निष्पन्न झाले आहे. सध्या या भागात दोन नर व एक पूर्ण वाढीची वाघीण यांचे वास्तव्य आहे. त्यामुळेच या बछड्यांची माता वाघीण कोण याबाबत सध्या स्पष्टता नाही. चारही बछड्यांचे शव चंद्रपूरच्या वन्यजीव सुश्रुषा केंद्रात आणण्यात आले असून पोस्टमार्टम नंतर डीएनएद्वारे (DNA) या बछड्यांची माता वाघीण निश्चित होणार आहे. सध्या कॅमेरे ट्रॅप व पायी गस्त वाढवून या परिसरात या पिलांच्या मृत्यूनंतर एखादी वाघीण फिरताना आढळते का याचाही अदमास प्रकल्पाच्यावतीने घेतला जात आहे.
वनक्षेत्र संवर्धन राखीव क्षेत्र
नाशिक जिल्ह्यातील 280 चौ किमी वनक्षेत्र संवर्धन राखीव क्षेत्र (conservation) म्हणून जाहीर करण्यात आलये. तीन तालुक्यातील जवळपास पन्नासहून अधिक गावातील 26 हजार हेक्टर वन जमिनी यांच्यावर आता विकास करण्याविषयी निर्बंध टाकण्यात आलेयत. प्राणी जातीय परिस्थितीकीय आणि वनस्पती विषयक महत्त्व असल्या कारणाने प्राणीजातींचे (animal kingdom) आणि त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासाथीचा हा निर्णय आहे . याअंतर्गत इगतपुरी तालुक्यातील 88.49 हेक्टर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 96.97 हेक्टर तर कळवण तालुक्यातील 8412 हेक्टर जंगल संवर्धित क्षेत्र राज्य शासनाच्या महसूल व वन मंत्रालयाने अधिसूचना जारी केली ये मात्र आता पर्यावरणाचे खरे संतुलन साधण्यासाठी इको सेन्सिटिव्ह झोन अंतर्गत सीमा रेषा आखण्याची गरज पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत.