पुणे : Raj Thackeray Sabha : आज पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा होणार आहे. पुण्यात गणेश कला क्रीडा मंडळात राजसभा होणार आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर आता राज ठाकरे पुण्यात सभा घेत आहेत.  या सभेत ते काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. पुण्यात मनसे कार्यकर्त्यांमध्ये राज ठाकरेंच्या सभेची कमालीची उत्सुकता आहे. पुण्यात मनसे कार्यकर्त्यांची 10 वाजताच्या सभेसाठी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.


राज सभेआधीच वसंत मोरे यांचा गनिमीकावा 


मोठा पोलीस बंदोबस्त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, या सभेच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त आहे. राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सभास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सुरक्षितता त्याचप्रमाणे नागरिकांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्यात आली आहे.


राज कुणावर निशाणा साधणार? 


पुण्यातल्या या सभेत राज ठाकरे आज कुणावर निशाणा साधणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.  राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित झालाय. राज आज या दौ-याविषयी तसंच राज यांना विरोध करणा-या भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविषयी काय भाष्य करणार याची उत्सुकता आहे. 


राष्ट्रवादीचे नेते उपमुख्ममंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयीही राज ठाकरे या सभेत बोलतील अशी शक्यता आहे. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला पहिल्या तीनही सभांत राज ठाकरे यांनी फैलावर घेतलंय. राज ठाकरे या सभेतही मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारवर भाष्य करतील अशी शक्यता आहे.