COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद : महावितरणच्या एका अभियंत्याने एका तक्रारदाराला मारहाण केल्याची घटना औरंगाबादेत घडली आहे,  या अभियंत्याने आणि त्याच्या साथीदारांनी या तक्रारदाराला जमिनीवर लोळवून बेदम झोडपले आहे.


रस्त्यावरील पोल हटवण्याची होती मागणी


या तक्रारदाराने ४ महिन्यापूर्वी रस्त्यावरील विजेचे पोल हटवावे, अशी तक्रार दिली होती, बुधवारी तक्रारदार त्या  अभियंत्याकडे गेले आणि कामाचं काय झालं अशी विचारणा केली.


बाचाबाची झाली आणि काही क्षणात हाणामारी


त्यात दोघांत जोरदार बाचाबाची झाली आणि काही क्षणात हाणामारी ही सुरु झाली, अखेर प्रकरण पोलिसात गेले, मात्र दोघांनीही तक्रारी दिल्या नसल्याने, या प्रकरणात अद्याप तरी कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही.