मुंबई : Cyclone Gulab : 'गुलाब' चक्रीवादळाचा परिणाम हा राज्यावर होणार आहे. त्यानुसार राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा (Rain) इशारा देण्यात आला आहे. तसेच अतिवृष्टीचा धोका कायम आहे. गुलाब चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे आज राज्याच्या विविध भागात अतिवृष्टीचा होईल. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिवृष्टी शक्य असून उद्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहिल. नंतर हा जोर निवळणार आहे. (Cyclone Gulab  : Torrential Rain Warning , Alert sounded in Konkan and Vidarbha)


राज्याच्या विविध भागात आज अतिवृष्टीचा इशारा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले गुलाब चक्रीवादळ निवळले आहे. त्याचं रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. त्यामुळे राज्यात विविध भागात अति मुसळधार पावसाचा इशारा आहे.  कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहील. 


राज्यात कुठे रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला 


बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ निवळले आहे. त्याचा कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.


मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, नगर, नंदुरबार, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम याजिल्ह्यांतही पाऊस पडले, असा इशारा देण्यात आला आहे.