नाशिक : आडगाव पोलीस ठाण्यातील ( ADGAON POLICE STATION ) हवालदाराला 20 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक झाली. हे प्रकरण ताजे असतानाच एका दबंग महिला सहायक निरीक्षकेला लाच घेताना अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात एक पोलीस नाईक यालाही अटक करण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक शहरात पोलीस लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे. आडगाव प्रकरणाची दखल घेत पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे ( CP JAYANT NAIKNAVRE ) यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख ( SR. PI. IRFAN SHAIKH ) यांची तडकाफडकी बदली केली असून पंचवटीचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) युवराज पत्की यांची येथे नियुक्ती केली आहे.


आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पदभार स्विकारल्यापासून लाचखाेर पाेलिसांवर कारवाईच्या मोहिमेने जोर धरला आहे. गेल्या दाेन दिवसांत एक महिला अधिकाऱ्यासह दाेन पाेलिसांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.


बुधवारी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या ( BHADRAKALI POLICE THANE ) महिला सहायक निरीक्षक यांना 20 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईत पोलीस नाईक यांनाही अटक करण्यात आली आहे. प्रणिता दीपक पवार (37) ( PRANITA PAWAR ) असे संशयित महिला सहायक पोलीस निरीक्षकाचे तर तुषार मधुकर बैरागी असे अटकेतील पोलीस नाईकाचे नाव आहे.


सहायक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार आणि पोलीस नाईक तुषार बैरागी यांनी तक्रारदाराविरुद्ध दाखल बलात्काराच्या गुन्ह्यात तपासात मदत करण्यासाठी व चार्जशीट पाठविण्याच्या मोबदल्यात 20 हजार रुपये लाच मागितली होती. ही लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.


आडगावच्या ट्रॅपनंतर पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांची तडकाफडकी बदली केली होती. त्यामुळे आता भद्रकालीतही अधिकारी ट्रॅप झाल्याने येथील वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार हे आयुक्तांच्या रडारवर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार या स्मार्ट पोलीस म्हणून मिरवून घेत असत. हायफाय ड्रेस, चष्मा अन् स्टाईलने मिरवणारी ही अधिकारी नाशिक शहरात मनसेच्या आंदोलक महिलांना अटक केल्यानंतर चर्चेत आली होती. या आंदोलक महिलांना अटक केल्यानंतर तिने एकदम झ्याक पोझ देत फोटो काढले होते.