पुणे : पुण्यात फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करणा-या मनसेच्या १४ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या कार्यकर्त्यांनी सिंहगड रोड परिसरातील फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केल्याचा आरोप आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यकर्त्यांनी स्टॉलधारकांना मारहाण करून त्यांच्याकडील पैसे हिसकावल्याचाही आरोप आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात दंगल आणि दरोड्याचे कलमदेखील लावण्यात आले आहे. 


याप्रकरणी तपास करून पुढील कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी म्हटलय. दरम्यान आंदोलन करणार्या कार्यक र्त्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यातआल्याच्या विरोधात मनसेनं सिंहगड रोड पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. 


परप्रांतियांचं हित जपण्यासाठी मनसेचं आंदोलन चिरडण्याचं हे षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.