दगडूशेठ हलवाई गणेशाची वाजतगाजत प्रतिष्ठापना
दगडूशेठ गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुणे : पुण्याचा दगडूशेठ हलवाई हे अवघ्या महाराष्ट्राचं अराध्य दैवत... दगडूशेठ हलवाई गणेशाची वाजतगाजत प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर गणेशाची भक्तीमय वातावरणात आरतीही झाली. दगडूशेठ गणेशाच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवसापासून भाविकांची गर्दी झाली आहे.
एकीकडे सार्वजनिक मंडळांच्या मंडपांमध्ये प्रतिष्ठापना केल्या जात आहेत. तर दुसरीकडे घरोघरी गणराय विराजमान झाले आहेत. गणेशमूर्ती घरी आणण्यासाठी सकाळपासून लगबग सुरू आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा गणरायाचा जयघोष करत गणेशमूर्ती घरोघरी आणल्या जात आहेत.