पुणे : Darad collapsed in Varandha ghat : महाड मार्गावरील वरंध घाटात (Varandha ghat) वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळली. या दरडीखाली अडकून एक जण गंभीर जखमी झाला आहे. रेस्क्यू टीमच्यामदतीने दीड तासाच्या प्रयत्नानंतर जखमी तरुणाला वाचविण्यात यश आले आहे. महाडच्या ग्रामीण रुग्णालयात जखमीवर उपचार सुरु आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे- महाड मार्गावरील वरंध घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. दरडीखाली अडकून एक जण जखमी गंभीर जखमी झाला.अरुण गणपत उंब्रटकर असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. 



अरुण उंब्रटकर यांचं घाटातील वाघजाई मंदिराशेजारी भजी, वडापावचं दुकानं होतं, दुपारच्या सुमारास अचानक डोंगराचा काही भाग अरुण यांच्या दुकानावर कोसळला. यामुळं अरुण हे त्या दगडांच्या ढिगाऱ्याखाली अडकून बसले, ही बातमी समजताच महाडची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखलं झाली आणि जवळपास दीड तासांनी दरडीखाली अडकलेल्या तरुणाला बाहेर काढण्यात यश आले.  


पावसाळ्यात अनेक पर्यटक वर्षाविहारासाठी वरंध घाटात गर्दी करत असतात. वाघजाई मंदिर परिसरातून वरंध घाटाचे विलोभनीय दृश्य दिसत असल्यानं या भागात पर्यटक थांबतात. त्यामुळे या परिसरात स्थानिक नागरिकांनी उपाजीविकेसाठी भजी, वडापावची दुकाने लावली आहेत.  


घटनेची माहिती मिळताच भोरचे प्रांतधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, उद्धव गायकवाड यांच्यासह भोर आणि महाड तालुक्यातील्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान मागच्यावर्षी जुलै मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये, वरंध घाटात जवळपास 30 ठिकाणी दरड कोसळ्याच्या घटना घडल्या होत्या. यंदाही दरडी कोसळण्याचा धोका अधिक असल्यानं स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानी केले आहे.