कोल्हापूर : कोल्हापुरातल्या दर्शन शहा अपहरण आणि हत्या प्रकरणी आरोपी योगेश उर्फ चारु चांदणेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय.  त्याशिवाय 1 लाख पाच हजाराचा दंडही ठोठावण्यात आलाय. २५ तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या खंडणीसाठी २५ डिसेंबर २०१२ ला कोल्हापुरातील देवकर पाणंद इथल्या दहा वर्षांच्या दर्शन रोहित शहा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शाळकरी मुलाचं योगेश चांदणेनं अपहरण केलं होतं. त्यांनंतर त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप चारू चांदणेवर होता. दर्शनचा खून केल्यानंतर आरोपी योगेशनं दर्शनच्या आईला पत्र पाठवुन मुलगा सुखरुप हवा असल्यास 25 तोळे सोनं द्यावं लागेल अशी खंडणी मागितली होती. या खुनाचा तपास करणा-या जुना राजीवाडा पोलीसांचीही योगेशनं दिशाभूल केली होती. 


विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणी 30 साक्षीदार तपासून २२ परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी तयार करून खटला मजबूत केला. या निर्णयानंतर दर्शनाच्या आई आणि अजीनं समाधान व्यक्त केलं.