प्रताप सरनाईक, झी मीडिया, कोल्हापूर : घरातील क्षुल्लक वादातून मुलीने थेट जन्मदात्या पित्याचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना इचलकरंजीत उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
इचलकरंजीमधल्या बर्गे मळआ परिसात शांतिनाथ केटकाळे पत्नी आणि तीन मुलींसह राहत होते.  शांतिनाथ केटकाळे यांची शेती असून ते शेतीचं काम करतात. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काही कारणावरुन घरात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की मोठी मुलगी साक्षी हिने लोखंडी गजाने वडिलांवर हल्ला केला.


साक्षीने लोखंडी गजाने वडिलांच्या डोक्यावर प्रहार केला. हा हल्ला इतका जबरदस्त होता की शांतिनाथ जागेवरच कोसळले, त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. आरडाओरडा ऐकून घरातले इतरजण धावत आल आणि त्यांना शांतिनाथ यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारापूर्वीच शांतिनाथ यांचा मृत्यू झाला होता.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पोहचत संशयित मुलगी आणि तिच्या आईला ताब्यात घेतलं आहे. कौंटुबिक वादातून हा खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र याबाबत अजून स्पष्टता झालेली नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.