मुंबई : राज्यात आज  16 हजार 620 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे आज  50 जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यूझाला आहे. राज्यातला मृत्यू दर 2.28 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर राज्यात आज 8 हजार 861 जण कोरोनामुक्त झाले असून 1 लाख 26 हजार 231 रूग्णांवर उपचार सुरू आहे. कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण डोंबिवलीत दिवसभरात कोरोनाचे 404 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 3 हजार 40 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 249 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 24 तासात 3 कोरोनाग्रस्तांचा बळी गेला आहे. 


नागपुरात उद्यापासून 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन घेण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पूर्वतयारी सुरू आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे शहरात कडक लॉकडाऊन घेण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरात 100 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. . 


पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या सह्याद्री स्कुलच्या 3 विध्यार्थी आणि 9 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात खेड तालुक्यात तब्बल 89 रुग्णांना कोरोनाची लागण झाली 


जळगाव जिल्ह्यात आज 979 नव्या रुग्णांची नोदं करण्यात आली आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. दिवसभरात 667 जण कोरोनामुक्त झाले असून, सहा कोरोनाग्रस्तांचा बळी गेला आहे. जिल्ह्यात सध्या 7 हजार 581 रूग्ण उपचार घेत आहेत.