मुकुल कुलकर्णी, झी मीडिया नाशिक : कोशिश करनेवालोंकी कभी हार नहीं होती है.... पंख होनेसे कुछ नहीं होता, हौसलोंसे उडान होती है... सुखवार्तामधली पुढची बातमी अशीच प्रेरणा देणारी.... पाहुया नाशिकमधल्या एका क्रिकेटपटूची सध्या का चर्चा होतेय.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमधल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर क्रिकेटचा सराव करणारा हा   दयावान जाधव...लहानपणापासूनच त्याचा एक हात अधू आहे, त्यामुळे उजव्या हाताचाच त्याला उपयोग करावा लागतो. पण म्हणून आपण इतरांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी आहोत, असं त्याला मुळीच वाटत नाही.... आणि हेच त्याच्या खेळातूनही तो दाखवून देतो.... 


सध्या दयावान त्र्यंबकेश्वर तालुका क्रिकेट टीमचा कॅप्टन आहे.... काही वर्षांपूर्वी त्यानं भारत विरुद्ध पाकिस्तानचा अपंगांचा सामना बघितला. त्यानंतर आपणही क्रिकेट खेळू शकतो, असं त्याला वाटलं आणि तिथूनच दयावानचा क्रिकेट प्रवास सुरू झाला. एका हातानं अधू असूनही तो स्पिन बॉलिंगही टाकतो आणि बॅटिंगही करतो.... याच अष्टपैलू खेळाच्या जोरावर त्याच्याकडे त्र्यंबकेश्वर टीमचं नेतृत्व आलंय. दयावानचे आईवडील शेतमजूर आहेत. तो सध्या आयटीआयचं शिक्षण घेतोय. 


दयावानचा खेळ पाहून त्याचे प्रशिक्षकही आश्चर्यचकित झाले होते. कुठल्याही सामान्य खेळाडूपेक्षा दयावानचा खेळ उत्कृष्ट असल्याचं ते आवर्जून सांगतात. 


दयावानची क्रिकेटमधली कामगिरी गेल्या तीन चार वर्षांपासून सातत्यानं उंचावतेय. आणि भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची त्याची इच्छा आहे.....दयावानचा आदर्श क्रिकेटचा देव असं ज्याला म्हंटलं जातं, तो सचिन आहे.... पण दयावानसारखे खेळाडूच मुळात एक प्रेरणा आहेत. अपंगत्वाला क्लीन बोल्ड करत त्यानं स्वतःच्या बाऊण्ड्रीज मोठ्या करण्याचं ठरवलं आणि म्हणूनच सीमारेषेपलीकडे जाणारे त्याची चौकार आणि षटकार जास्त कौतुकाचे वाटतात....