Neelam Gorhe Take Action Against Gopichand Padalkar: सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Session) भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्यात जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवर गोपीचंद पडळकर भाषण करत असताना दोघांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचा प्रकार समोर आला आहे. निलम गोऱ्हे यांनी भाषण आवरतं घेण्याची सुचना करताच पडळकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सभागृहाचं वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाषणाला 13 मिनिटे झाल्यानंतर सभापतींनी त्यांना भाषण आवरतं घेण्यास सांगितलं. तुम्ही गणित बिघडवून देता. इतरांना इतका वेळ देता आणि उगाच वाद घालता, असं पडळकर म्हणाले. साडे आठ झालेत मर्यादा ठेवा, सभागृहास वेठीस धरु नका, असं गोऱ्हे म्हणाल्या. त्यावर पडळकरांनी प्रत्युत्तर दिलं. मी वेठीस धरत नाही, कशाची मर्यादा आहे तुम्ही? नियोजन नीट ठेवा ना.. असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर गोऱ्हे यांनी माईक बंद करण्याची सुचना करताच मी निषेध व्यक्त करतो, असं म्हणत हातातील पेपर फाडले.


एक आठ दहा विषय आहेत ते मी मांडतो, असं म्हणत पडळकरांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही माझा निषेध केलाय ते मी सभागृह कामकाजातून काढून टाकतेये. तुम्ही जे वर्तन केलेले आहे त्यामुळे उद्या तुम्हाला दिवसभर सभागृहात बोलू देणार नाही, असं निलम गोऱ्हे म्हणाल्या. वाद आणखीच पेटल्याचं पाहता दीपक केसरकरांनी, झालेल्या घटनेबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांना आवश्यक त्या सुचना या वरिष्ठांकडून देण्यात येतील असं आपल्याला आश्वासित करतो, असं केसरकर म्हणाले.


पाहा Video



दरम्यान, मी काही चुकीचं बोललो नाही तरी देखील मी चेअरचा मान राखून दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत पडळकरांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, पडळकरांची शिक्षा कायम राहणार आहे. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, अशी ताकीद निलम गोऱ्हे यांनी दिली आहे.