दोघा शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मृतदेह अहमदनगरमध्ये
नगर : नगर जिल्ह्यातल्या केडगावमध्ये गोळीबारात मृत्यू पावलेल्या संजय कोतकर आणि वसंत ठुबे या दोघा शिवसेना पदाधिका-यांचे मृतदेह अहमदनगरमध्ये आणण्यात आलेत. या मृतदेहांचं शवविच्छेदन औरंगाबादमध्ये करण्यात आलं. मात्र या दोघांचे मृतदेह थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात नेणार असल्याची भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. यामुळे जिल्ह्यातली तणावपूर्ण परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.