उस्मानाबाद : जिल्ह्यात स्वाइन फ्लूने एका पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तुळजापूर तालुक्यातील सलगरा-दिवटी इथं ही घटना घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मुलीला उपचारासाठी सोलापूरच्या खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. तिच्यावर उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. स्थानिक आरोग्य प्रशासनाने या प्रकरणात दुर्लक्ष केल्याची टीका आता केली जात आहे.


सलगरा दिवटी येथील साक्षी गवळी आजारी असल्यामुळे सोलापूरच्या खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी केलेल्या तपासणीत स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांनतर खर्चाच्या कारणावरून तिला पुन्हा सोलापूरच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले होते. त्याच ठिकाणी तिचा मृत्यू झाला. 


खबरदारीची उपाययोजना म्हणून या चिमुकल्याच्या कुटुंबातील जवळच्या नातलगांची तपासणी जिल्हा रुग्णालयातील एका पथकाने केली. स्वाइन फ्लूच्या भीतीने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.