निलेश वाघ, झी मीडिया, नाशिक : देशाचा 74 व्या प्रजासत्ताक दिन (Republic Day 2023 ) मोठ्या उत्सासाहत साजरा करण्यात आला. मात्र, उत्साहाला गालबोट लागले आहे. नाशिकमध्ये (Nashik) प्रजासत्ताक दिनाच्या प्रभात फेरीत (Republic Day Rally) घडली धक्कादायक घटना घडली. विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमधील मनमाड येथील नांदगावच्या जातेगावमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. प्रजासत्ताक दिनाच्या प्रभात फेरीत हा धक्कादायक प्रकार घडला. चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. पूजा दादासाहेब वाघ असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. पूजा नांदगाव तालुक्यातील जातेगावच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता माध्यमिक विद्यालयात नववीत शिक्षण घेत होती. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतर्फे प्रभात फेरी काढण्यात आली होती. या  प्रभात फेरीत पूजा सहभागी झाली होती.


प्रभात फेरी सुरु असताना पूजाला अचानक चक्कर आली. चक्कर आल्यामुळे पूजा जमीनीवर कोसळली. शाळेतील शिक्षकांनी तात्काळ तिला उपचारासाठी रुग्णलायात नेले. मात्र, उपचारासाठी नेत असतानाच पूजाचा मृत्यू झाला. 
पूजाला जन्मापासूनच फुफुसाला होल होता. डॉक्टरांनी तिला शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते. मात्र, शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच पूजाचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


क्रिकेट सामना सुरु असताना तरुणाचा मृत्यू


नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील एनबीटी महाविद्यालयात क्रिकेटचे सामने सुरु असताना एका तरुणाचा मृत्यू झाला. आकाश रवींद्र वाटेकर असे मृत तरुणाचे नाव आहे. आकाश अवघा 32 वर्षांचा आहे. क्रिकेट खेळत असताना आकाशला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. तो बेशुद्ध होऊन खाली पडला. त्याला तात्काळ त्यांच्या मित्रांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. हृदय विकाराच्या झटक्यानं आकाशचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.