रायगड : मुंबई गोवा महामार्गावरच्या अपघातग्रस्त सावित्री नदीवरचे पुलाचे भग्नावेश अखेर आयोगाच्या परवानगीनंतर हटवण्यात आले आहेत.


४० जणांचा बळी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२ ऑगस्ट २०१६ ला रात्री सावित्री पुलावर दुर्घटना घडली त्यात ४० जणांचा बळी गेला होता. या अपघाताच्या कारणमिमांसेसाठी शासनानं आयोगाची स्थापना केली होती. 


जुना पूल पाडण्याची परवानगी


आयोगाच्या सदस्यांनी एप्रिलमध्ये पुलाची पाहणी केली. जुन्हा पुलामुळे नव्या पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती, त्यामुळं राष्ट्रीय महामार्ग विभागानं जुना पूल पाडण्याची परवानगी आय़ोगाकडे मागितली होती. परवानगीनंतर पुण्याच्या टी एँड टी कंपनीनं पुलाचे भग्नावेष हटवण्याचं काम पूर्ण केलं. हे सगळं घडत असलं तरी आयोगाचा अहवाल अजुनही गुलदस्त्यातच आहे.