बारामती : 'जर तर च्या गोष्टींवर बोलण्यात काही अर्थ नाही, ३० ऑक्टोबरला राष्ट्रवादी ची बैठक आहे, त्यात आमचा निर्णय होईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रस्ताव आला तर विचार करणार का या प्रश्नाला ते उत्तर देत होते...! निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पवार कुटुंबियांवर लोकांचं प्रेम पाहायला मिळतं आहे. आम्ही विरोधी पक्षात बसायचं ठरवलं आहे. मतदारांनी सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यांना युतीचं सरकार आणायचं आहे. वरिष्ठांनी सगळ्यांनी सांगितलं आहे. त्यावर अजून मी वक्तव करु इच्छित नाही. ३० तारखेच्या बैठकीत सर्व प्रमुख सहकारी मिळवून ठरवू.' असं देखील अजितदादांनी म्हटलं आहे.


सुप्रिया सुळे यांनी मात्र यावर बोलायचं टाळलं. दिवाळीनिमित्त पवार कुटुंबियांकडून आयोजित करण्यात आलेल्या फराळाच्या कार्यक्रमात शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार आणि पार्थ पवार यांनी उपस्थितांची भेट घेतली.