नागपूर : Mumbai - Nagpur Samruddhi Highway News : नागपूर-मुंबई हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण पुढे ढकलण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात प्रमाणे काही सुपर स्ट्रुक्चर बनवण्यास  दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे हा लोकार्पण सोहळा किमान दीड महिन्यासाठी  पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 समृद्धी महामार्गावर अनेक ठिकाणी वन्यजीव उन्नत मार्ग म्हणजेच वाइल्डलाइफ ओवरपास बनवण्यात आले आहे. मात्र एका ठिकाणी आर्च पद्धतीचा ओवरपासला अपघातामुळे हानी झाली आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम 30 एप्रिल पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काही कारणास्तव ते 30 एप्रिल पर्यंत पूर्ण होऊ शकणार नाही.


तसेच तज्ज्ञांनी आता वन्यजीव उन्नत मार्गासाठी नव्या पद्धतीचे सुपरस्ट्रक्चर बनवण्याचे सुचविले आहे. त्यासाठी आणखी दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नागपूर ते शेलुबाजार दरम्यान समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा किमान दीड  महिने पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे. 



आधी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण दोन मे रोजी करण्याचे नियोजित होते. त्यासाठी महा विकास आघाडी सरकार ते तयारीही सुरू केली होती... नुकतच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर ते शेलुबाजार  पर्यंत समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची पाहणीही केली होती. महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वन्यजीवबाबत कमालीची आस्था आहे. त्यामुळे वाहतूक सुरु झाल्यानंतर वाइल्ड लाईफ ओव्हरवर पास या निर्णयामागे महत्वाचे होते.