जालना : भाजप हा चांगला पक्ष असून आमचा मोठा भाऊ आहे. हा पक्ष चांगलाच ठेवायचा असेल तर भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नारायण राणेंना भाजपात घेऊ नका, असा सल्ला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी भाजपला दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जालना मध्ये आज कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भातील बैठक केसरकर यांच्या उपस्थितीत पार पडली.या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.जनतेने दोन तीन वेळा फटके देऊनही राणे सुधारले नाहीत.राणेंना पैशाची गुर्मी आहे आणि राणेंची हीच गुर्मी जनताच उतरवू शकते.


अशा तिखट भाषेत आज गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणेंचा समाचार घेतला. राणे शिवसेनेचे आमदार फोडण्याची भाषा करताहेत हे आमदार पैशाच्या जीवावर फोडणार का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.