अमरावती : अमरावतीच्या मेळघाट मधील गुगामल वन्यजीव परिक्षेत्राच्या आरएफओ दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट आलंय. दीपाली यांनी आत्महत्या करण्यापुर्वी लिहिलेलं आणखी एक पत्र सापडलंय. यामध्ये दीपाली यांनी मनीषा उईके या महिलेवर गंभीर आरोप केले आहेत. मनीषाने माझे आयुष्य बरबाद केले असे या पत्रात दीपाली यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपाली यांनी वरिष्ठ अधिकारी असलेला उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या मानसिक त्रासाला कंटाळून गुरुवारी रात्री आत्महत्या केली होती. आत्महत्या पूर्वी लिहलेल्या सुसाईड नोट मध्ये त्यांनी आपल्या मृत्यूला वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमारच जबाबदार असल्याचे त्यांनी लिहले होते. त्यानंतर आरोपी शिवकुमार ला पोलिसांनी नागपूर मधून अटकही केली.



दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ माजली आहे. दरम्यान या सर्व प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय. दिपाली यांनी मृत्यूपूर्वी पतीला लिहिलेलं एक भावनिक पत्र समोर आलंय. आहते पत्र समोर आले आहे.


मनीषा उईके तिच्या आयुष्यात कधीच सुखी होणार नाही. तिने माझे आयुष्य बर्बाद केले आहे, असं दिपाली यांनी त्या पत्रात लिहीलं आहे. त्यामुळे आता मनिषा उईके कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.