खोपोली : मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर बोरघाटजवळ एका सांबराचा अपघाती मृत्यू झाला. पहाटे सहाच्या सुमाराल एका वाहनानं सांबराला उडवलं. आयआरबी पेट्रोलिंग आणि डेल्टा फोर्सचे जवान घटनास्थळी दाखल झाले. खोपोली पोलीस स्टेशनमध्ये यांसदर्भातली माहिती देण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनाधिका-यांनाही याबाबत माहिती देण्यात आलीय. एक्स्प्रेस वेवर बोरघाटला लागूनच खोपोलीचं जंगल आहे. रात्रीच्यावेळी अनेक वन्यजीव रस्त्यांवर येत असतात. मात्र वन्यजीवाच्या अपघाताची घटना इथे पहिल्यांदाच घडलीय.