सातारा : Satara District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीतील पराभवाचे पडसाद उमटताना दिसून येत आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच दगडफेक केली. सातारा राष्ट्रवादी कार्यालय फोडल्याने येथे तणावाचे वातावरण आहे. (Defeat of Shashikant Shinde, stoning of NCP workers at NCP district office at Satara)


सातारा जिल्हा बँक निवडणूक निकाल, या दिग्गजांना मोठा झटका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, सातारा जिल्हा मध्यमर्ती बँक निवडणुकीत एका मताने पराभूत झालेले शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी हे कार्यालाय फोडल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी शशिकांत शिंदे याचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पराभवामुळे दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहेत. दगडफेक केलेल्या शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक  निकालाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यामधील राष्ट्रवादीमधील धुसपूस समोर आली आहे. शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीमध्ये जावळी सोसायटी मतदार संघातून माजी मंत्री शशिकांत शिंदे हे पराभूत झाले आहेत. शिंदे केवळ एका मताने पराभूत झाले. याचा राग त्यांच्या समर्थकांनी काढल्याचे बोबले जात आहे. पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केल्याचा आरोप केला जात आहे. 



सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपाच्या साथीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील हे आठ मतांनी जिंकले. कराड सोसायटी मतदार संघातून बाळासाहेब पाटील यांनी निवडणूक लढवली होती. तर दुसरीकडे शिवसेनेचे गृह व वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा पाटण सोसायटी मतदार संघातून 14 मतांनी पराभव झाला.