ठाणे  : ठाणे जिल्ह्यात डेल्टा प्लस चे चार रुग्ण आढळले. ठाणे महापालिका क्षेत्रात 3 तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 1 रुग्ण आढळला आहे. या रुग्णांमध्ये 25 वर्षा खालील 2 जण तर 56 वर्षा खालील 2 जणांचा सामावेश आहे. यात 2 महिला आणि दोन पुरुष आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क 
जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हायरसचा शिरकाव झाल्याने प्रशासनाने त्वरित पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. इतर आवश्यक काळजी घेण्याचे प्रशासनाने आवाहनही केले. 


रुग्णावर उपचार करून पाठवण्यात आले तर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात असल्याची, अशी माहिती ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.


राज्यात डेल्टा प्लस रुग्णांच्या संख्येत वाढ, आरोग्य मंत्र्यांची माहिती


राज्यात डेल्टा प्लस रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. २१ वरून ही संख्या ४५ वर गेलेली आहे. यात पुरुष २७, स्त्रिया १८ असा समावेश आहे. (The number of Delta Plus cases in Maharashtra has increased, State Health Minister Rajesh Tope) रत्नागिरी, जळगाव, मुंबई इथे हे रुग्ण आहेत, तर औरंगाबाद, बीडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहेत. त्यामुळे आता नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी.


प्रत्येक जिल्ह्यातील १०० नसुन घेतले जातात आणि त्यात बदल झाले आहेत का त्याची तपासणी केली जात असल्याची माहिती आरोग् मंत्र्यांनी दिली आहे.  यात ४५ डेल्टाचे डेल्टा प्लस रुग्ण आढळले आहेत. मात्र घाबरण्याचे कारण नसल्याचे राजेश टोपेंनी सांगितले आहे.  कारण डेल्टा आणि डेल्टा प्लसमध्ये फार काही फरक नसतो.


या रुग्णांची आपण विशेष काळजी घेत आहोत.  त्यांच्या संपर्कात कोण कोण आलंय त्याची बारकाईने माहिती घेत आहोत, अशी माहिती देखील यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. कोविडची स्थिती मागील महिन्यांपासून सारखीच आहे.  रुग्णसंख्या कमीही होत नाही आणि वाढतही नाही ती ६ ते ७ हजारच्या घरातच आहे. 


११ जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी दर राज्याच्या सरासरीच्या जास्त आहे. राज्यात डेल्टा प्लस रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे.  २१ वरून ही संख्या ४५ वर गेलेली आहे, यात पुरुष २७, स्त्रिया १८ आहेत. रत्नागिरी, जळगाव, मुंबई इथे हे रुग्ण आहेत, तर औरंगाबाद, बीडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे.