Kalyan Lok Sabha : ठाकरे गटाने कल्याण लोकसभेमधील संपूर्ण निवडणूक ही संशयास्पद असून पुन्हा एकदा फेर निवडणूक घ्यावे अशी मागणी केली आहे. ही बनावट मतदार ओळखपत्र असून त्याच आधारावर नवनिर्वाचित खासदार हे निवडून गेले असावेत असा दाट संशय आम्हाला आहे असा आरोप ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवार वैशाली दरेकर यांनी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांना या संदर्भात निवेदन देखील दिले. मात्र, ही मतदार ओळखपत्र रस्त्यावर कोणी टाकली, ती खरी आहेत की बनावट या संदर्भाची चौकशी होणं महत्त्वाचं आहे. दरम्यान या मतदार ओळखपत्राच्या प्रकरणावरून ठाकरे गटाला आयतं कोलीत मिळालय अशी चर्चा सुरू आहे.


बालेकिल्ला राखण्यात शिंदेंना यश


ठाण्याचा गड राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी झालेत. ठाण्यातून नरेश म्हस्के तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे विजयी झालेत. नरेश म्हस्केंनी ठाकरे गटाच्या राजन विचारेंचा पराभव केलाय. तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंनी ठाकरे गटाच्या वैशाली दरेकरांचा पराभव केलाय. आपल्या बालेकिल्ल्यात शिंदेंनी ठाकरेंना मोठा धक्का दिल्याची चर्चा आहे.


ठाणे लोकसभा मतदारसंघात प्रथमच दोन शिवसैनिकांमध्ये सरळ लढत झाली. या मतदारसंघातील मराठी भाषिक 51 टक्के मतं या निवडणुकीत निर्णायक ठरल्याचं बोललं जातंय. त्यामुळं विद्यमान खासदार असलेल्या राजन विचारेंना पराभवाची धूळ चारण्यात नरेश म्हस्केंना यश आल्याची चर्चा आहे.


कल्याणमधून अगदी शेवटच्या टप्प्यात श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. कार्यकाळातील विकासकामांच्या जोरावर श्रीकांत शिंदेंनी प्रचारात आघाडी घेतली. त्यांच्याविरोधात ठाकरे गटानं वैशाली दरेकर यांना रिंगणात उतरवलं. मात्र, तुल्यबळ उमेदवार नसल्यानं श्रीकांत शिंदेंसाठी ही निवडणूक सोपी झाल्याचं राजकीय जाणकार सांगतात.


मराठी मतांचा टक्का आपल्याकडे वळविण्यासाठी शिंदेसेना आणि उद्धवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. ठाणे लोकसभा मतदारसंघ मीरारोड-भाईंदर ते नवी मुंबई,बेलापूरपर्यंत विस्तारलेला आहे. महापालिकेत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता राहिली आहे. त्याचा लाभ त्यांना निवडणुकीत झाल्याचं बोललं जातंय.