नवी दिल्ली : आपलं स्वतःच घर असावं, असं प्रत्येकाला वाटतं. आणि तुम्ही जर घर घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी ही योग्य वेळ आहे. कारण सध्या बँकेतून स्वस्त दरात होमलोन्सची ऑफर मिळत आहे. त्यामुळे तुम्ही देखील या संधीचा लाभ घेऊ शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँक ऑफ बडोदा आणि एसबीआय या बँकांनी स्वस्त होमलोन्सची ऑफर केल्यानंतर देना बँकेनेही स्वस्त व्याज दरात लोन देण्याचे जाहीर केले आहे. या बाबतीत देना बँकेने बँक ऑफ बडोदा आणि एसबीआय ला देखील मागे टाकले आहे. 


काही दिवसांपूर्वी बँक ऑफ बडोदा आणि एसबीआयने ८.३०% दरात होमलोन देण्याची घोषणा केली होती. आता देना बँकेने ८.२५% दरात होमलोन देण्याचे जाहीर केले आहे. देना बँकेची ही ऑफर खुदरा कर्ज कार्निवलचा एक भाग आहे. त्यामुळे ही संधी या वर्षअखेरीस पर्यंत असेल. 


देना बँकेचे खुदरा कर्ज कार्निवल १६ नोव्हेंबर २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत असेल. त्या दरम्यान ८.२५% ते ९.०% व्याज दरात होमलोन उपलब्ध होईल. नोव्हेंबरच्या सुरुवातीला ८.३% दरात होमलोन आणि ८.७% दरात ऑटो लोन देण्याचे घोषित केले होते. त्यावेळेस होमलोनचा हा सर्वात स्वस्त दर होता. 


घर आणि वाहन कर्जाला प्रोत्साहन देण्यासाठी  'कार्निवल' ला सुरुवात केल्याचे देना बँकेने सांगितले. त्यामुळे ७५ लाखांपर्यंतचे कर्ज ८.२५% आणि कार लोन ९% दरात मिळेल. त्याचबरोबर महिलांना वाहन कर्ज ८.९% दरात उपलब्ध होईल. तसंच या कालावधीत देना बँक कोणत्याही प्रकारचे लोन प्रोसेसिंग चार्जेस आकारणार नाही. 


सध्या अनेक बँकातून ८.३५% होमलोनची ऑफर देण्यात येत आहे. त्या तुलनेत देना बँकेतून अधिक स्वस्त दरात लोन उपलब्ध होत आहे.