रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगली(Sangali) जिल्ह्यातील मिरज(Miraj) येथे चोरांनी चक्क ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारांच्या अनामत रकमेवर अर्थात डिपॉजीटवरच डल्ला मारला आहे. मिरजेतील शासकीय धान्य गोदाम वैरण बाजार येथे मिरज तालुक्यातील 36 ग्रामपंचायतींच्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जात होते. यादरम्यान बेडगचे ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी सदाशिव तुकाराम मगदूम यांच्याकडची 7 हजार 200 रुपयांची अनामत रक्कम चोरांनी लांबवली. या प्रकरणी मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिरजेतील शासकीय धान्य गोदाम वैरण बाजार येथे मिरज तालुक्यातील छत्तीस ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशित पत्र स्वीकारण्याचे काम निवडणूक प्रशासनाकडून सुरू होते. यादरम्यान विचित्र घटना समोर आली आहे. चक्क चोरट्याने उमेदवारांची भरलेली अनामत रक्कमच लंपास केल्याने मिरज शहरात एकच खळबळ उडाली आहे. 


बेडग ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी सदाशिव तुकाराम मगदूम(वय 42)  यांच्याजवळ असलेली रक्कम चोरट्यांनी चोरली आहे. 30 नोव्हेंबर 2022 रोजी ही घटना घडली आहे. याबाबत महसूल कर्मचारी सदाशिव तुकाराम मगदूम यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात मिरज शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अज्ञात चोरट्याच्या विरोधात मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला, असून याबाबतचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत.