उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. आपल्याला एखादा मुद्दा किंवा गोष्ट नाही आवडली तर ते तिथेच स्पष्टपणे सांगतात. त्यांच्या या स्वभावाची चुणूक अनेकदा जाहीर कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळाली आहे. उद्घाटन किंवा लोकार्पणाच्या कार्यक्रमाला अजित पवार फक्त औपचारिकता न करता संपूर्ण कामाची पाहणी करतात. ही पाहणी करताना जर त्यांना काही खटकलं तर ते अधिकाऱ्यांना तिथेच धारेवर धरतात. नुकताच पुण्यातील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा याचा परिचय आला. अजित पवार जीएसटी भवनच्या (GST Bhavan) इमारतीचे उद्घाटन करायला पोहोचले असता तिथे पायरीवर सिमेंट पाहून चांगलेच चिडले आणि सर्वांदेखत अधिकाऱ्याला खडेबोल सुनावले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवारांच्या हस्ते पुण्यातील  जीएसटी भवनच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यासह वडगावशेरी मतदारसंघातील 300 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजनदेखील अजित पवारांच्या हस्ते झालं. उद्घाटनाला पोहोचल्यानंतर अजित पवारांनी तेथील कामाची पाहणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती घेतली. पण पायऱ्यांवरुन वर जात असताना एक बाब त्यांच्या नजरेस पडली आणि त्यांनी सर्वांदेखल पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याला सुनावलं. 


नेमकं काय घडलं?


अजित पवार इमारतीचं उद्घाटन करण्यासाठी गाडीतून पोहोचले होते. गाडीतून उतरल्यानंतर अधिकारी त्यांनी माहिती देत होता. यानंतर ते इमारतीकडे जात असताना अजित पवारांची नजर पायरीवर पडली. पायरीवर पडलेल्या सिमेंटबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना विचारणा करत आपली नाराजी जाहीर केली. 


झालं असं की, पहिल्या पायरीवर सिमेंट होतं. अजित पवारांनी अधिकाऱ्याला हे काय झालं आहे? अशी विचारणा केली. त्यावर अधिकाऱ्याने ते काढायचं राहिलं? असं उत्तर दिलं. अधिकाऱ्याचं उत्तर ऐकल्यानंतर अजित पवारांनी त्याला सुनावलं की, "हे मला काढायला ठेवलं का? तुम्हाला माहित आहे ना मी बारीक बघतो..मग हे कशाला झक मारायला ठेवलं का?". अजित पवार चिडल्यानंतर सर्व उपस्थित त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते. 


दरम्यान इमारतीच्या आत मोकळ्या जागेत ड्रेनेज चेंबर रस्त्याच्या मधोमध असल्याचं पाहूनही अजित पवार चिडले. अशी छा चू गिरी करू नका अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना झापलं.