पुणे : मेट्रोचे काम लॉकडाऊनच्या काळात रखडले होते. या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आज उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पहाटे सहा वाजता पुणे स्टेशन येथून मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाच्या पाहणीला सुरुवात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार यांनी पुणे स्टेशनसह वनाज डेपो आणि शिवाजीनगर येथील कामांची पाहणी केली. मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या. 
त्यांनी पुणे स्टेशन, व्हील पार्क डेपो (वनाज), शिवाजीनगर कृषी महाविद्यालय येथे पाहणी करून मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या सुरू असलेल्या कामाबाबत सविस्तर माहीती दिली.



अजित पवार यांनी शिवाजीनगर येथे मॉडेल ट्रेनने प्रवास केला. शिवाजीनगर येथील बोगदा काम, व्हील पार्क (वानज) येथील कचरा डेपोचे अत्याधुनिक मेट्रो डेपोमध्ये रूपांतर करण्यात आले आहे, येथील कामाचीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. मेट्रोच्या रेणू गेरा यांनी या मेट्रो डेपो उभारणीबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


 पुणे स्टेशनपासून मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाच्या पाहणी केल्यानंतर पवार यांनी यावेळी मेट्रोचं काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्याकडून मेट्रोच्या कामाबाबत सविस्तर माहिती घेतली.