मुंबई : हिंगोली, नागपूर, वर्धासह राज्यभरात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कुठे शेतातील  शेतातील कापूस ओला झाला, हरभऱ्यावर घाटेअळी पडायला सुरवात झाली आहे. तर कुठे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांनी आक्रमण चढवलंय. यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न राज्यात ऐरणीवर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत गारपीटमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान आणि त्याच्या भरपाईवर देखील भाष्य केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर हवामानात बद्दल झाले आहेत. अशा प्रकारचे नैसर्गिक संकट येत तेव्हा राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला येते. केंद्राकडून याबद्दल मदत मागवली जाते. तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली जात आहे. उद्या कर्जमाफी संदर्भात व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे जिल्हाधिकारी आणि बॅंकाशी संपर्क साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. बोलल्यानंतर कृती करण्यावर माझा विश्वास असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. 


ज्या शेतकऱ्यांचे नुकसान त्याचे पंचनामे केले जातील. मंत्रालयात गेल्यावर त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. मुख्यमंत्र्यांशी मी या संदर्भात चर्चा करणार आहे. ते  निर्णय घेतील असेही ते म्हणाले.



पीक वाया गेलं 


अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. कापूस भिजलाय, तूर, हरभरा पिकांवरही पावसाचा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांचं हाती आलेलं पीक वाया गेलं जात आहे. अवकाळी पावसामुळे रब्बीच्या हंगाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आज पहाटेपासूनच जिल्ह्यात सर्वदूर धुवाधार पाऊस झाला


हिंगोली जिल्ह्यातही सकाळपासून पाऊस पडतोय. सलग पाच दिवस ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर आज पावसाने हजेरी लावली. परभणी जिल्ह्यातही पाऊस पडतोय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. नागपूर जिल्ह्यात आज सकाळपासूनच पाऊस कोसळतोय. काटोल, नरखेड ग्रामीण भागात काही ठिकाणी गारपीटही झाल्याचीही माहिती मिळत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.