जर तुम्ही शेतकऱ्यांकडे CIBIL मागितला तर FIR दाखल करणार; देवेंद्र फडणवीसांचा बँकांना इशारा, `नंतर आम्हाला...`
पीक कर्ज देताना शेतकऱ्यांकडे सी-बिल मागितले तर FIR करणार असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय बँकांना दिला आहे. एफआयआर झाल्यानंतर आमच्याकडे येऊ नका असंही ते म्हणाले आहेत.
पीक कर्ज देताना शेतकऱ्यांकडे सी-बिल मागितले तर FIR करणार असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय बँकांना दिला आहे. एफआयआर झाल्यानंतर आमच्याकडे येऊ नका अशी तंबीही त्यांनी दिली आहे. राज्यस्तरीय बँकर्स समितीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मंत्री धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील हेसुद्धा या बैठकीला उपस्थित होते. तसंच रिझर्व्ह बँक, नाबार्ड आणि राष्ट्रीयीकृत बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय बँकांना तंबीच दिली. शेतकऱ्यांकडे सीबिल मागितले तर एफआयआर दाखल करणारच असा इशारा देताना तसं झाल्यास आमच्याकडे येऊ नका असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. गेल्यावेळी सुद्धा आम्ही सांगितले, पण बँका ऐकत नसतील तर आमचा नाईलाज आहे. गरीब शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभे राहिलेच पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.