नाशिक : राज्यात  पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने हाहा:कार माजवला आहे. अशात नाशिक  जिल्ह्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वक्षण स्थगित करण्याचा निर्णय मागे घेण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावली आहे.  शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या स्वाक्षरीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वेक्षण पूर्ववत ठेवण्याच्या आदेशाचे पत्र काढावे लागले. राज्यात कोरोना  रूग्णांची  संख्या वाढत  आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अकरावी आणि पाचवी ते नववीचे वर्ग बंद करण्याचे आदेश दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाय, शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम थांबवावी अशी मागणी शिक्षकांच्या संघटनांनी केली. यासंबंधी घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली. मात्र काही संघटनांनी यासंबंधी लेखी आदेशाविषयी विचारणा केली. शिवाय अधिकृत घोषणा झाली नसल्याचे देखील स्पष्ट केले. 



त्यावर शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या स्वाक्षरीसह सर्वेक्षणाचे पत्र व्हायरल झाल्यानंतर संबंधीत  अंतिम  टप्प्यात पोहोचल्यानंतर उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याची टीका शिक्षकांनी केली. शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणास स्थगिती दिल्याचे आदेश एका लिपिकाच्य़ा चुकीमुळे झाल्याचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी सांगितलं आहे.