पुणे : मुख्यमंत्री कार्यालयात होणाऱ्या चहापानावरील खर्चावरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही जोरदार चिमटा काढला आहे. आपण मुख्यमंत्री असताना चहापानावर एवढा खर्च होत नव्हता, असं पवार म्हणाले. मुख्यमंत्री कार्यालयात चाय पे केवळ चर्चाच नाहीत. तर जोरदार खर्चा होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी आकडेवारीसह केला होता. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री कार्यालयात केवळ चहापानावर 3 कोटी 34 लाख 64 हजार 905 रूपये खर्च झाल्याचं त्यांनी सांगितलं. एवढा चहा कोणी पिऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली सुरू असलेल्या या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणीही निरूपम यांनी केली.


पवारांचे सरकारला खडे बोल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केवळ पट संख्या कमी आहे, म्हणून शाळा बंद करण्याच्या निर्णयावरून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला खडे बोल सुनावलेत. या निर्णयामुळं आदिवासी भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. 


पुण्यात पवारांचं वक्तव्य


एकवेळ प्रशासकीय खर्चात कपात करा, पण जिथं नवी पिढी घडवायचीय तिथं कपातीचा विचार करू नये, असंही पवारांनी सुचवलं आहे. पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अमृत महोत्सवी सांगता समारंभ ते बोलत होते.