Maharashtra Assembly Winter Session 2022:  श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर (Shraddha Walkar Murder Case) देशभर खळबळ उडाल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर 'लव्ह जिहाद'बाबत (love jihad Law) कायदा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशातच आता सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं वक्तव्य केलं. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आपण विशेष पोलीस पथक नेमणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. (Devendra Fadnavis big announcement on Love Jihad law in Maharashtra Assembly Winter Session 2022 marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर चर्चेला जोर धरला. श्रद्धा वालकरने आफताबविरोधात तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांवर दबाव होता. दबाव हा राजकीय होता का?, असा सवाल देखील भातखळकरांनी उपस्थित केला. त्यानंतर त्यावर फडणवीसांनी उत्तर देताना मोठं विधान केलंय.


आणखी वाचा - Winter Session: "मुख्यमंत्र्यांनीही रेवड्या वाटल्या का? एकनाथ शिंदे राजीनामा द्या...", अधिवेशनात जोरदार गदारोळ!


आंतरधर्मीय लग्नाला (Interfaith marriages) माझा विरोध नाही. लव्ह जिहाद हे नाव केरळ (Kerala) सरकारने दिलंय. अभ्यास करून यासंदर्भात प्रभावी कायदा करण्याची गरज असल्यास तो करण्याची राज्य सरकारची मानसिकता आहे, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे.



दरम्यान, श्रद्धा वालकरच्या वडिलांची माझी भेट झाली. त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव नव्हता. एखाद्या महिलेने तक्रार केली तर पोलिसांनी त्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. किमान तिला बोलवून तिचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, असं फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. गेल्या काही काळात जाणीवपूर्वक षडयंत्राचा भाग म्हणून काही जिल्ह्यांमध्ये असं लग्न केलं जात असल्याचा आरोप देखील फडणवीसांनी यावेळी केला आहे.