Devendra Fadnavis V/s Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एका सभेत एक विधान केलं होतं. त्यामुळे राज्यातील राजकारण देखील चांगलेच तापले होते. मात्र, पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एकतर मी राहिल किंवा तू राहशील' या वक्तव्यावर ठाकरेंना स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, 'मी ढेकणाला आव्हान देत नाही, 'मी' म्हणजे संस्कारी महाराष्ट्र, 'तू' म्हणजे दरोडेखोरांचा पक्ष'. तुझ्या नादाला लागण्याइतक्या कुवतीचा तू नाही. असं उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. 


फडणवीस यांचा ठाकरेंवर पलटवार


उद्धव ठाकरेंच्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांचा डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते अत्यंत फ्रस्टेशनमध्ये आहेत. ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत. त्यावर आपण काय उत्तर देणार आहोत. किमान एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्टेशनमध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो. तेव्हा त्याला फार उत्तर देयचं नसतं पण, जे अमित शाह यांनी सांगितलं होत. औरंगजेब फॅन क्लब, आपण औरंगजेब फॅन क्लबचे आहोत हे उद्धव ठाकरे यांनी दाखवले आहे. 


वाघनखांवरून ठाकरेंचा मुनगंटीवारांवर हल्लाबोल


अहो मुनगंटीवार नखाच्या मागे वाघ असतो तेव्हा त्याला अर्थ असतो. या नखाच्या मागे शिवाजी राजा म्हणून वाघ होता त्यामुळे त्याला महत्त्व आहे. मात्र, या नखाच्या मागे मुनगंटीवार असेल तर काय अर्थ. मुनगंटीवार आता जनता तुम्हाला वाघनखं दाखवेल. वाघनखांवरून उद्धव ठाकरे यांचा सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे.