जळगाव : विधानसभेत देवेंद्र फडणवीस मागच्या 5 टेबलच्या नंबरवर बसत होते. मी विरोधी पक्ष नेता असताना माझ्या जवळ फडणवीस यांना बसवले. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांना वारंवार बोलण्याची संधी दिली. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या राजकीय जीवनात माझी मोलाची मदत झाली, असं राष्ट्रवादीचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीस यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यास सर्वांचा नकार होता. पण, मुंडे साहेब यांच्या आग्रहास्तव मी त्यांना संमती दिली. त्यामुळेच ते प्रदेशाध्यक्ष झाले. मी मित्रत्वाचं नातं जोपासलं. पण, त्यांनी माझ्यामागे एक षड्यंत्र, कुभांड रचल.


मुख्यमंत्रिपदावरून मला मागे ठेवण्यात आले यावरूनच एका कार्यक्रमात मला एक गाणं आठवलं, 'दुश्मन ना करे दोस्तने वो काम किया है, जिंदगीभर मुझे बदनाम किया है' 


जळगावातील भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना खडसे म्हणाले, गॅस, डिझेल, पेट्रोल दिवसेंदिवस वाढत आहेत. यासाठी गिरीश महाजन यांनी आंदोलन केलं असतं तर बरं झालं असतं. ते नेहमी आंदोलन, मोर्चे करत असतात. पण, ते फक्त नौटंकी नाटक असतं अशी टीका त्यांनी केली.


गिरीश महाजन माझी मुख्यमंत्रीपदावरून खिल्ली उडवतात. परंतु, मी किमान त्या पदावर गेलो. कुणी पोरीबाळींच्या मागे लागून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जात नाही अशी जहरी टीका खडसे यांनी केलीय.