Maharashtra Politics : फडतूस नाही काडतूस आहे मी, झुकेगा नही घुसेगा... देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक रंगली. फडतूस, लाळघोटे गृहमंत्री अशा शब्दांत ठाकरेंनी फडणवीसांवर हल्ला चढवला. तर, फडणवीसांनीही नागपुरी भाषेत ठाकरेंचा हल्ला परतवून लावला.
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रोशनी शिंदेंविरोधात (Roshani shinde) पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. यानंतर पुन्हा एकदा राज्याचे उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. फडतूस नाही काडतूस आहे मी, झुकेगा नही घुसेगा असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे (Maharashtra Politics).
उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक रंगली. फडतूस, लाळघोटे गृहमंत्री अशा शब्दांत ठाकरेंनी फडणवीसांवर हल्ला चढवला. तर, फडणवीसांनीही नागपुरी भाषेत ठाकरेंचा हल्ला परतवून लावला. नागपुरात भाजप-शिवसेनेची सावरकर गौरव यात्रा सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात्रेत सहभागी झाले आहेत. सावरकर गौरव यात्रेच्या समारोपावेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अनेकांना देशाचा इतिहास माहिती नाही. त्यांच्या पक्षाचे काही भविष्य नाही. राहुल गांधी सावरकरही नाहीत आणि गांधी देखील नाहीत असं म्हणत फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. भाजप नेत्यांनीही उद्धव ठाकरेंवर चांगलंच तोंडसुख घेतल आहे.
उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांच्यावर काय टीका केली होती?
रोशनी शिंदे प्रकरणावर बोलताना उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, फडणवीसांना झेपत नसेल तर राजीनामा द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलीय. तर, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री की गुंडमंत्री? असा जोरदार घणाघातही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केला होता.
काय आहे नेमकं प्रकरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार मारहाण झाली. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटाकडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. रोशनी शिंदे या ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्या आहेत. फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत शिंदे गटाने रोशनी शिंदेंना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही संपूर्ण मारहाण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.रोशनी शिंदेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. त्यातच रोशनी शिंदेंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्याने या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.