कोल्हापूर : कर्जमाफीच्या मुद्यावर ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अवकाळीग्रस्तांना तातडीची मदत देण्याची गरज असताना त्यांची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी सरकारवर केला आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारनं अधिवेशनाची केवळ औपचारिकता पूर्ण केल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. तसंच कोरेगाव-भिमा प्रकरणात दाखल करण्यात आलेले गुन्हे कायदेशीरच असल्याचंही ते यावेळी म्हणाले. सीएएसंदर्भात विरोधक अफवा पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिवेशन ही केवळ औपचारिकता म्हणून या सरकारने पार पाडलं. फक्त ६ मंत्री या मंत्रिमंडळात होती. चर्चा झाल्या त्यावर उत्तर देण्यात आली नाही. फक्त ३-३ मिनिटात उत्तर देऊन वेळ मारुन नेली. उद्धव ठाकरे यांनी २५ हजार रुपये हेक्टरी मदत करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. आज शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. पण दुर्दैवाने सरकारने एक नवा पैसाही दिला नाही. कर्जमाफीची घोषणा हे यूटर्न होतं. असा आरोप त्यांनी केला आहे.



नागरिकत्व कायदा हा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. हा नागरिकत्व देणारा कायदा आहे. नागरिकत्व घेणारा नाही. भारतात मध्ये सगळे लोकं सुरक्षित आहेत. जाणीवपूर्वक गैरसमज पसरवतात आहे. काही पक्ष यावर आघाडीवर आहेत. पण काही लोकं असं देखील त्यांनी म्हटलं आहे.