देवेंद्र फडवणीस नाराज, अजित पवार यांच्या `या` कार्यक्रमावरुन नाराजीनाट्य रंगले
Nagpur Police Bhavan : नागपूर पोलीस भवन उदघाटनावरुन नाराजी नाट्य रंगले आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस भवनाचे उदघाटन होणार आहे.
नागपूर : Nagpur Police Bhavan : नागपूर पोलीस भवन उदघाटनावरुन नाराजी नाट्य रंगले आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस भवनाचे उदघाटन होणार आहे. मात्र या कार्यक्रमाच्या उदघाटन पत्रिकेत प्रमुख उपस्थितांमध्ये फडणवीस याचे नाव नाही. त्यांचे नाव सन्माननीय उपस्थितांच्या यादीत खाली कुठेतरी छापण्यात आले आहे. त्यामुळे फडणवीस नाराज असल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित राहणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे.
पोलीस भवन लोकार्पणापूर्वी नाराजीनाट्य
नागपूर सिव्हिल लाईन्समधील पोलीस भवनाचे लोकार्पण आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील असतील. पोलीस भावनाचे दोन विंगमध्ये विभाजन करण्यात आले आहे.
ए विंगमध्ये पोलीस आयुक्तालय तर बी विंगमध्ये ग्रामीणचे पोलीस अधीक्षक कार्यालय असेल. सुमारे चार एकरमध्ये असलेले पोलीस भवन सात माळ्याची इमारत आहे. 2018 तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन केले होते. सुमारे 110 कोटी रुपये खर्च करून सुसज्ज अशी पोलीस भवनाची इमारत अवघ्या चार वर्षात तयार होऊन सज्ज झाली आहे.
मात्र पोलीस भवन इमारत लोकार्पणपूर्वी नवा वाद समोर आला आहे. लोकार्पण कार्यक्रम पत्रिकेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव प्रमुखउपस्थितांमध्ये नसल्यामुळे भाजपाने नाराजी व्यक्त केली आहे.