देवेंद्र फडवणीस शिवसेनेत येणार?, पाहा संजय राऊत काय म्हणाले...
येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राज्यात शिवसंपर्क अभियान सुरु केलं आहे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी संघटनात्मक बांधणीसाठी कोल्हापूरमध्ये दौरा केला.
कोल्हापूर : मुख्यमंत्री ( Cm Uddhav thackrey ) उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लोकांच्या मनात आस्था आहे. आपल्या घरातील माणूस मुख्यमंत्री झालाय अशी सामान्य जनतेची भावना आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न चिन्ह निर्माण करणे चूक आहे. राज्यात विरोधक आहेत. पण, त्यांची भूमिका आरोप करणे इतकीच आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
तळागाळात काम करणाऱ्या शिवसैनिकांची सन्मान व्हावा ही शिवसेनेची ( Shivsena ) भूमिका आहे. त्यामुळेच संजय पवार ( Sanjay Pawar ) यांच्यासारख्या शिवसैनिकाला राज्यसभेची उमेदवारी दिली. संभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chatrpati ) यांना आम्ही शिवसेनेत या असे म्हटले होते.
शिवसेना पुरस्कृत उमेदवार याबाबत विचार करू असं म्हटलं होतं. पण, शिवसेना नेत्यांच्या बैठकीत आम्ही शिवसैनिकाला पाठविण्याचा निर्णय घेतला, असे राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच, यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत बाजूला बसलेल्या संजय पवार ( Sanjay Pawar ) यांचा उल्लेख नवनिर्वाचित खासदार असा केला.
शिवसेनेने पक्षाचा निर्णय घेतला तरी त्यावर विरोध टीका करतात. यामध्ये विरोधकाना काय असुरी आनंद मिळतो हे कळत नाही. चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) हे कोणा कोणाचे वंशज आहेत. 2019 साली कोणी शब्द तोडला हे त्यांनी आधी सांगावे. त्यांनी 'चोंबडेपणा' करू नये अशी टीका राऊत यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज ( Chatrapati Shivaji Maharaj ) हे कोणाच्या मालकीचे नाहीत. ते संपूर्ण विश्वाचे आहेत. शिवसेना पक्षाचा निर्णय हे आमचे नेते आणि पक्षप्रमुख घेणार. आमच्या पक्षाने काय करवाई, कुणाला उमेदवारी द्यावी याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. त्यावर फडणवीस यांनी बोलू नये. शिवसेनेने काय करावे हे सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) शिवसेनेत येणार आहेत का? असा टोला त्यांनी यावेळी लगावला.