मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील अधिक सतर्क झाली आहे. आताच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अपूरी आहे. त्यामुळे राज्य सरकारला आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. असं वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नव्या स्ट्रेनबद्दल सरकारकडून  प्रबोधन होत नसल्यचं देखील फडणवीस म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फडणवीस म्हणाले, 'राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. पण बेड आणि व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहे. सरकारने अधिक चर्चा करून सर्व गोष्टींचा पुरवठा कसा वाढवता येईल याचा विचार करून चर्चा केली पाहिजे. पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंट सोबतच लसीकरण या गोष्टी किती वेगाने करता येतील याकडे राज्य सरकारने लक्ष दिलं पाहिजे.. ' असं फडणवीस म्हणाले. 



'राज्य सरकारने सक्तीची कारवाई करून 4 ते 5 हजार कोटी रूपये  वीज ग्राहकांकडून जमवलेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आताची परिस्थिती पाहाता वीज कनेक्शन कापणं बंद केलं पाहिजे. सध्या राज्यात लॉकडाऊन आणि पार्शल लॉकडाऊन सुरू होत आहे. त्यामुळे लोकांच्या रोजगारावर मोठा परिणाम होणार आहे. म्हणून वीज कनेक्शन कापण्याचा निर्णय मागे घ्यायला हवा. 


फडणवीस पुढे म्हणाले, 'आम्ही या परिस्थितीत राज्य सरकारला मदत करायला तयार आहोत जनता देखील तयार आहे. पण राज्य सरकारने सर्वांचा  विचार करण्याची गरज असल्यांचं फडणवीस म्हणाले.