औरंगाबाद: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे एक छायाचित्र सध्या सोशल मीडियावर भलतेच व्हायरल होत आहे. या छायाचित्रात मुंडे चक्क भजी तळताना दिसत आहे.


भजी तळणे हा सुद्धा जॉबच आहे -  पंतप्रधान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राप्त माहितीनुसार, देशातील रोजगार निर्मितीबाबत बोलताना पंतप्रधानांनी भजी तळण्याचा आणि विक्री करण्याचा गाडा हा सुद्धा जॉबच आहे, अशा आषयाचे वक्तव्य केले होते. पंतप्रधानांच्या या विधानावरून विरोधकांनी टीकेची झोड उडवली. दरम्यान, पंतप्रधानांच्या विधानाचा अधिक उपहास करत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे सिडकोतील हॉटेल रामा इंटरनॅशनलच्या मागे "अमित शाह पकोडा सेंटर' सुरु करण्यात आले आहे. या पकोडा सेंटरला धनंजय मुंडे यांनी रविवारी (११ फेब्रुवारी) भेट दिली. या वेळी मुंडे यांनी भजी तळून पंतप्रधानांच्या विधानाचा निशेध केल्याचे बोलले जात आहे. 


रोजगार निर्मिती ठरले सरकारसाठी दिवास्वप्न?


दरम्यान, २०१४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणूक प्रचारात भाजपच्या वतीने नरेंद्र मोदी यांनी तडाखेबंद भाषणबाजी केली होती. यात त्यांनी 'अच्छे दिन', भारताबाहेरील काळा पैसा भारतात आणणार, भ्रष्टाचार थांबवणार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेरोजगार तरूणांसाठी लोखोंच्या संख्येत रोजगार निर्मिती करणार', अशी अश्वासने दिली होती. पण, प्रत्यक्षात मात्र दाखवलेल्या स्वप्नांप्रमाणे सरकारला रोजागर निर्मिती करण्यात अपयष आले. दरम्यान, सरकार आता पू्र्वी असलेल्या व्यवसायांनाही नोकरीचे स्वरूप देत जूनीच आकडेवारी नव्याने दाखवत आहे, असा विरोधकांचा आक्षेप आहे.


दरम्यान, धनंजय मुंडे यांनी जेव्हा अमित शहा पकोडा सेंटरमध्ये औरंगाबादमध्ये पकोडा सेंटरमध्ये भजी तळली. तेव्हा,  अभिजित देशमुख, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष दत्ता भांगे, रहिम पटेल, बाळु औताडे, श्री.येडे पाटीलही उपस्थित होते.