परळी, बीड : परळीमधील वैद्यनाथ साखर कारखान्यामध्ये जी दुर्घटना घडली त्या घटनास्थळाला भेट देण्यासाठी विरोधी पक्ष नेते गेले असता पोलिसांनी त्यांना भेट देण्यापासून रोखलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाच ते दहा मिनिटं वादावादी झाल्यानंतर मुंडे यांनी घटनस्थळाची पाहणी केली. याप्रकरणी दोषी असणा-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी राज्याचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. कारखान्यात जी घटना घडली त्याला प्रशासन जबाबदार आहे की, चेअरमन याची चौकशी झाली पाहिजे. 


यामध्ये मानवी चूक असल्याचं दिसून येतं त्यामुळे या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आपण हा विषय अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.