नागपूर: झी २४ तासने उघडकीस आणलेल्या तुरुंगातील गैरप्रकारांबाबत विधिमंडळात सरकारला जाब विचारणार असल्याचं विधानपरिषदेतले विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. झालेल्या प्रकारांची प्रधान सचिवांमार्फत चौकशी व्हायला हवी असंही मुंडेंनी म्हटलंय. राज्यातल्या तुरुंगांमधून ६७५ कैदी फरार असून त्यापैकी चारशेहून अधिक कैद्यांचे फोटो सुद्धा कारागृह प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचा धक्कादायक अहवाल झी २४ तासनं पुढे आणला होता.


गृहखात्याच्या भोंगळ कारभार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, नाशिकचं कारगृह म्हणजे खूनचा अड्डा बनल्याचंही पुढे आलंय. गेल्या ३ वर्षात हे प्रकार वाढले असून, गृहखात्याच्या भोंगळ कारभार याला जबाबदार आहे असं धनंजय मुंडे यांनी झी 24 तासशी बोलतना म्हटलंय.


नाशिक मध्यवर्ती कारागृहात हत्याचं सत्र


नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात हत्याचं सत्र सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव झी २४तास जगासमोर मांडल्यावर आता राजतल्या तुरुंग प्रशासकाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक सशक्त पुरावा झी २४ तासच्या हाती लागलाय. राज्यातील चौदा कारागृहातून ६७५ परोलवरून  सोडलेलेकैदी फरार आहेत. विशेष म्हणजे यातील ५११ कैदी जन्मठेपेचे आहेत. विशेष म्हणजे यातील ४२७ फरार कैद्यांचे फोटो प्रशांसनाकडे उलब्ध नसल्याच धक्कादायक अहवाल झी 24 तासच्या हाती लागला आहे. आता या प्रकरणी गृहखातं काय भूमिका घेतं याकडे लक्ष लागून आहे.