`भाजप सरकार चले जाव`; धनगर समाजाचं पुण्यात आंदोलन
पुण्यात जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात आली आहे.
पुणे: 'भाजप सरकार चले जाव'ची घोषणा देत धनगर समाज पुण्यात येत्या १० ऑगस्टला पुण्यात भव्य आंदोलन करणार आहे. पुण्यातील विधान भवन येथे धनगर समाजातील सर्व आजी-माजी आमदार, महापौर, जिल्हापरिषद सदस्य येऊन एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हे आंदोलन होणार आहे. पुण्यात जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात आली आहे.
धनगर आरक्षणावरही चर्चा - जानकर
दरम्यान, विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणासह सह धनगर आणि इतर समाज्याच्या आरक्षणाबाबतही चर्चा होणार आहे. मराठा आणि धनगर समाज्यातील युवकांनी जरा धिर धरावा आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलु नये असे अवाहन राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी शिर्डीत बोलतांना केलय.
आंदोलनादरम्यान होणारी हिंसा आणि आत्महत्या थांबाव्यात - मुख्यमंत्री
दरम्यान, 'मराठा आरक्षणासंदर्भात नोव्हेंबरपर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. वेळ पडली तर विशेष अधिवेशन बोलवू, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मात्र, मराठा आरक्षणासाठीच्या होणाऱ्या आत्महत्या आणि हिंसा थांबायला हव्या. त्यामुळे महाराष्ट्राचं चुकीचं चित्र जातंय, अशी विनंती मराठा आंदोलनाच्या नेतृत्वाला करतोय, असंही मुख्यमंत्री म्हणाले.